शाओमीने रेडमी नोट ७ प्रो प्रथम भारतात केला लाँच

redmepro
चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात रेडमी नोट ७ हा मागच्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेला फोन गुरुवारी लाँच करतानाच त्याबरोबर रेडमी नोट ७ प्रो हा फोन जगात सर्वप्रथम भारतात लाँच केला आहे. नेपच्यून ब्ल्यू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक अश्या तीन रंगात तो सादर केला गेला आहे.

या फोनला ६.३ इंची फुल एचडी प्लस डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉचसह दिला गेला असून बॅक पॅनल्ला गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिले गेले आहे. त्यात सनलाईट डिस्प्ले रीडिंग मोड फिचर आहे. रिअरला ४८ एमपी आणि ५ एमपीचे कॅमेरे तर फ्रंटला १३ एमपीचा एआय कॅमेरा आहे. फोनची बॅटरी ४००० एमएएचची आहे आणि ती क्विकचार्ज ४ टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. ६ जीबी रॅम ,१२८ जीबी स्टोरेजसह हे व्हेरीयंट सादर केले गेले आहे. अँड्राईड ९.० पाय ओएस आहे.

Leave a Comment