‘बायसेक्शुअल’बाबत हे काय बोलून गेली ‘लिली सिंग अका सुपरवुमन’

lilly-singh
सध्याच्या काळात सोशल मीडियासोबतच युट्यूबची देखील चलती असल्यामुळे युट्यूब देखील तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ही तरुणाई युट्यूबच्या माध्यमातून चित्रपटाचे ट्रेलर, गाणी आणि इतर विविध कार्यक्रम पाहत असतात. ते पाहण्यासाठी आपला तासन् तास वेळ सर्फिंगमध्ये घालवतात आणि तरुणाई या युट्यूबवर असणाऱ्या फुलटाईम आणि प्रोफेशनल युट्यूबरचे व्हिडीओ जगात खुप कुतुहलाने पाहिले जातात. ‘लिली सिंग अका सुपरवुमन’ हे यातीलच एक नाव असून याच सुपर वुमन लिलीने आपण बायसेक्शुअल असल्याचे सोशल मीडियावर जाहिर केले आहे.
lilly-singh1
माझ्या आयुष्यात ही गोष्ट अनेकदा अडथळा म्हणून माझ्यासमोर आली. पण आता त्याच गोष्टीला मी माझी सुपरपॉवर म्हणून आनंदाने मान्य करते. अनेकांना लिलीच्या या ट्विटनंतर आश्चर्याचा धक्का बसला तर तिने मोकळेपणाने आपण बायसेक्शुअल मान्य केल्याचे अनेकांनी कौतुक केले.


आपल्या युट्यूब चॅनलद्वारे लिली कोट्यवधी रुपये कमावते. तिच्या या युट्यूब चॅनलवर हजेरी लावण्याची बॉलिवूडपासून हॉलिवूडच्या कलाकारांना इच्छा असते. लिलीचा २०१७ मध्ये सर्वाधिक कमावणाऱ्या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत समावेश होता.

Leave a Comment