28 वर्षांपासून या वादग्रस्त बेटावर एकट्या राहत आहेत 81 वर्षांच्या आजीबाई

dokodo
दक्षिण कोरिया आणि जपान या दोन देशांमधील वादग्रस्त असलेल्या दोकोदो बेटावर मागील २५० वर्षांपासून मानवी वावर बंद करण्यात आला आहे. पण दोन देशात ज्या बेटावरुन वाद सुरु आहे त्या रिकाम्या बेटावर किम सिन-योल या आजीबाई गेले २८ वर्षे राहत आहेत. या आजीबाईंची सध्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचा विषय ठरत आहेत.
dokodo1
या आजीबाई गेली अनेक वर्षे अनेक अडचणी आणि संघर्षाचा सामना करत या बेटावर एकट्याच राहत आहेत. किम सिन-योल या आजी दोकोदो बेटावरील एकमेव नागरिक आहेत. या आजीबाईंनी कितीही विनंती करुन देखील त्या काही केल्या हे बेट सोडायला तयार होत नाही. १९९१ मध्ये आपल्या पतीसोबत पहिल्यांदा किम सिन-योल ही आजी या बेटावर आली. तिच्या पतीचे गेल्याच वर्षी निधन झाले. ती पतीच्या निधनानंतरही या बेटाबाहेरच्या लोकवस्तीतर परतली नाही.
dokodo2
नैसर्गिक वायू आणि खनिजांनी दोकोदो हे बेट भरले असले तरीही जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा प्रचंड भाव असल्यामुळे येथे राहणे या जोडप्यासाठी होते. या बेटाचा नजीकच्या लोकवस्तीशी (शहर) संपर्क खराब वातावरणामुळे अनेक महिन्यांसाठी आजही तूटतो.

Leave a Comment