
मुंबई : आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त झाले असून राज्यात त्यांच्याजागी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुबोध जयस्वाल यांची ‘पोलीस महासंचालकपदी’ तर संजय बर्वे यांची ‘मुंबई पोलीस आयुक्त’पदी नियुक्ती
तर, महाराष्ट्राच्या ‘पोलीस महासंचालक’ नियुक्ती सुबोध जयस्वाल यांची झाल्यानंतर रिक्त झालेल्या ‘मुंबई पोलीस आयुक्त’ पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय बर्वे हे १९८६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दत्ता पडसलगीकर हे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी निवृत्त होणार होते. पण त्यांना राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. पडसलगीकरांना राज्य सरकारला दोन वर्षांची मुदतवाढ द्यायची होती, पण राज्याची मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली.
