पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी – अमेरिका

america
वॉशिंग्टन – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकचे अमेरिकेने देखील समर्थन केले आहे. त्याच बरोबर पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा तीव्र शब्दात अमेरिकेने खडसावले आहे. दहशतवाद्यांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर सीमा संघर्ष भारतासोबत असलेला चर्चेतून सोडवावा, असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत – पाक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. हा तणाव लष्करी कारवाईतून सोडवता येणार नसून यामुळे संघर्ष वाढू शकते. दोन्ही देशांनी त्यांच्यातील प्रश्न चर्चेतून सोडवावे असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बुधवारी आम्ही पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली आहे. सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशा कुठलाही कारवाईला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन पाकिस्तानला केले असल्याचे माइक पोम्पिओ यांनी म्हटले होते.

पाकिस्तानकडून बुधवारी हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले होते. राजौरी परिसरात आणि नौशेरा सेक्टरपर्यंत पाकिस्तानी वायुदलाचे लढाऊ विमान आले होते. मात्र, भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. पाकिस्तानचे एक लढाऊ विमान या कारवाई दरम्यान, पाडण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

Leave a Comment