मसूदच्या जैश-ए-मोहम्मदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी एकवटले फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लंड

masood-azhar
नवी दिल्ली – क्रुरकर्मी दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरीका आणि इंग्लंड या देशांकडून मांडण्यात आली असून या देशांनी त्याचबरोबर मसूदच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेला ब्लॅकलिस्ट करण्याचीही मागणी यात केली आहे. दरम्यान भारताकडून पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत होती.

मागील काही दिवसांपासून भारताकडून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत होती. मसुदच्या जैश संघटनेने पुलवामा येथे करण्यात आलेला भ्याड दहशवादी हल्ल्याही घडवून आणला होता. दहशतवादाला त्याच्या संघटनेकडून चालना दिली जात असल्याचा आरोप भारताकडून केला जात होता. पण पाकिस्तानकडून हे सर्व आरोप खोटे असल्याचा कांगावा करण्यात येत होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडलेल्या प्रस्तावामुळे पाकचा खरा चेहरा आता जगासमोर आला असून हा भारताचा विजय असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment