कोकणात अनुष्का शर्माचे पशुवैद्यकीय रुग्णालय

anushka-sharema
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ज्याप्रमाणे आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे ती तिच्या पाळीव प्राण्यांवर असलेल्या प्रेमासाठी देखील प्रसिद्ध आहे. दरम्यान गेल्या गेल्या तीन वर्षांपासून ती भटक्या तसेच पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय बांधण्याच्या प्रयत्नात होती. त्यानुसार अनुष्काने रत्नागिरीतील गावात जागा घेतली होती, पण २०१६ पासून या जागेवरून वाद सुरू आहेत. आता तिला रुग्णालय बांधण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असून लवकरच तिच्या या रुग्णालयाचे काम सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. तसेच याठिकाणी ती भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी निवाराही बांधणार आहे.

याबाबत एका वर्तमान पत्राने दिलेल्या वृत्तानुसार पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी अनुष्काला निवारा उभारायचे असून त्याच्या शेजारी तिला तिच्या वडीलांसाठी घर बांधयाचे आहे. पण ही जागा काही कारणास्तव वादात सापडली होती. पण आता या जागेचा वाद मिटला असून त्याठिकाणी लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन अनुष्काचे वडिलच पाहणार असल्याचे देखील वृत्त आहे. अनुष्काने तिच्या अधात्मिक गुरूंच्या सल्ल्यावरून प्राण्यांसाठी निवारा उभारण्याचे ठरवले असल्याचेही सुत्रांकडून समजत आहे.

Leave a Comment