महिला ज्युडोपटूने पुतीन यांना दाखविले अस्मान

nataliya
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन याचे क्रीडा प्रेम सर्वश्रुत आहे. फिटनेससाठी पुतीन घोडेसवारी, ज्युडो, आईस हॉकी, बोटिंग असे खेळ सातत्याने खेळतात. मात्र सोची येथील एका क्रीडा प्रशिक्षण शिबिरात रशियाच्या नतालिया कुजिऊतिना हिने पुतीन यांना ज्युडो खेळताना अस्मान दाखविल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

नतालिया रशियाची ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती ज्युडोपटू आहे. या शिबिरात पुतीन यांनी ज्युडो खेळाडूबरोबर चांगली फाईट दिली तेव्हा नतालिया पुतीन यांच्या कौशल्याचे बारकाईने निरीक्षण करत होती. पुतीन याच्याबरोबर फाईट करण्याची तिची वेळ आली तेव्हा तिने पुतीन यांचेच डाव वापरून त्यांना डोक्यावर उलटे पडले. अर्थात पुतीन यांनी पहिली चाल करेपर्यंत नतालिया बचावात्मक खेळली आणि नंतर वेळ येताच तिने पुतीन यांना अस्मान दाखविले. अर्थात पुतीन या प्रकारामुळे रागावले नाहीतच पण त्यांनी नतालियाशी गळाभेट घेतली.

स्टेडीयम बाहेर आल्यावर पुतीन यांनी असाच सराव आपल्याला आवडतो असे स्पष्ट केले. पुतीन रशियन गुप्तचर यंत्रणा केजीबी मध्ये गुप्तहेर होते तेव्हा त्यांनी मार्शल आर्त आणि अन्य साहसी क्रीडाप्रकारात प्राविण्य मिळविले आहे आणि आजही ते तितक्याच क्षमतेने हे खेळ खेळू शकतात.

Leave a Comment