लाँच झाला १८ हजार एमएएच बॅटरीचा एनर्जायझर स्मार्टफोन

powerbank
मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये तब्बल ५० दिवस बॅटरी बॅकअप देणारा एनार्जायझर पॉवर मॅक्स पी १८ के पॉप हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. या फोनला १८ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली असून ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.

या फोनला रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट असून त्यात १२, ५ आणि २ एमपीचे कॅमेरे दिले गेले आहेत तर सेल्फीसाठी १६ प्लस २ एमपीचे ड्युअल पॉप अप कॅमेरे आहेत. फोनला ६.२ इंची आयपीएस एलसीडी स्क्रीन, अँड्राईड ९.० पाय ओएस असून सतत व्हिडीओ प्लेबॅक साठी बॅटरी बॅकअप २०० तासांचा आहे.

कंपनीचा दावा आहे कि फोनची बॅटरी मोठी असली तरी कमी वेळात चार्ज होण्यासाठी युएसबी २.० पॉवर डिलिव्हरी सिस्टीमचा वापर केला गेला असून १८ वॉट क्विक चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. या फोनचा वापर पॉवरबँक म्हणूनही करता येणार आहे. म्हणजे या फोनच्या सहाय्याने अन्य डिव्हायसेस चार्ज करता येणार आहेत.

Leave a Comment