भुतांनी बांधलेले भूतनाथ मंदिर

bhootnath
देवांचे देव महादेव यांचा महाशिवरात्र हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात महादेवाची असंख्य मंदिरे आहेत आणि या सर्व मंदिरातून महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी लोटते. उत्तरप्रदेशातील हापूरच्या दातिया गावात महादेवाचे एक वेगळे मंदिर आहे. याला भूतनाथ मंदिर असे म्हणतात कारण हे मंदिर भुतांनी एका रात्रीत बांधले असा समज आहे. महादेव जसे देवांचे देव तसे ते भूत, राक्षस यांचेही भगवान आहेत. इतकेच नाही तर शिव पार्वती विवाहात भूतप्रेते वऱ्हाडी म्हणून हजर होती असे शिवपुराणात वर्णन आहे.

हे मंदिर अतिशय भव्य आहेच पण प्राचीन असूनही या मंदिराची पडझड झालेली नाही. स्थानिक लोक सांगतात त्यानुसार या मंदिराचा कळस माणसांनी बांधला. तो कुठेकुठे थोडा खराब आहे मात्र भुतांनी बांधलेल्या मंदिराचा एकही चिरा ढासळलेला नाही. भुतांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले पण कळस बांधण्यापूर्वी सूर्योदय झाला आणि त्यामुळे भूतांना जावे लागले. अनेक नैसर्गिक आपदाना तोंड देऊन हे मंदिर खडे आहेच पण पूर, दुष्काळ, गारपीट, मुसळधार पाउस अश्या संकटात हे मंदिर गावाचे रक्षण करते असा भाविकांचा विश्वास आहे.

पुरातत्व तज्ञांच्या मतानुसार लाल दगडात बांधलेले हे मंदिर भुतांनी बांधलेले नसून तिसऱ्या शतकात ते गुप्त साम्राज्यात बांधले गेले असावे. मंदिरात हिंदू, मुल्स्लीम, शीख आणि ख्रिश्चन धरमंची प्रतिक चिन्हे आढळतात.

Leave a Comment