
नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर अशी दिग्गज स्टारकास्ट असलेल्या ‘धमाल’ सिरीजचा तिसरा भाग म्हणजेच टोटल धमाल हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल गल्ला जमवला असून कॉमेडी चित्रपटांमध्ये विकेंडला सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे.
टोटल धमालची बॉक्स ऑफिसवर धमाल कमाई
इंद्र कुमार यांनी टोटल धमाल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून बॉक्स ऑफिसवर त्यांचे आजवरचे अनेक चित्रपट हिट ठरले आहेत. इंद्र कुमार यांच्या टोटल धमाल या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 16.50 कोटीचा गल्ला जमवला. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नसल्या तरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 20.40 कोटीचे कलेक्शन केले तिसऱ्या दिवशी 25.50 कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने 9.85 कोटींची कमाई करत तब्बल 72.25 कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत. माऊथ पब्लिसिटीमुळेच टोटल धमाल या चित्रपटाला एवढा गल्ला जमवता आला आहे. या चित्रपटाचे कलेक्शन पाहाता हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा पल्ला पार पाडेल असे म्हटले जात आहे.
