काम बूट पॉलिश आणि कमाई दरमाह 19 लाख

shoe
मॅनहॅटन – आपल्या देशात एखादा बूट पॉलिशचे काम करुन महिना किती पैसे कमवत असेल याच अंदाज आपण लावू शकतो. पण अमेरिकेतील मॅनहॅटन शहरात राहणारी एक व्यक्ति फक्त बूट पॉलिश करुन किती कमाई करतो हे जर तुम्हाला सांगितले तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. ही व्यक्ति बूट पॉलिश करुन दरदिवशी जवळपास 900 डॉलर अर्थात जवळपास 64 हजार रुपये कमवातो म्हणजेच अशा पद्धतीने त्याची महिन्याची कमाई सरासरी 17 ते 19 लाख रुपयांवर जाते. आहे ना आश्चर्यचकित करणारी बातमी.
shoe1
त्याचे नाव डॉन वार्ड असे असून आपल्या यशाचे रहस्य सर्वांसमोर त्यानेच मांडले आहे. जॉनने सुरुवातीला जेव्हा आपल्या कमाईबद्दल लोकांना सांगितले, तेव्हा कुणालाही विश्वास बसला नाही. आता तर लोक त्याची कमाईची ट्रिक ऐकून फॅन होत आहेत.
shoe2
आपल्या कमाईबाबत माहिती देताना जॉनने सांगितल्याप्रमाणे, एका फोटो लॅबमध्ये तो आधी काम करत होता. त्या ठिकाणी मिळणाऱ्या पैशातून तो समाधानी नव्हता. त्याच्या कुठल्याही मित्राची कमाई त्याच्याएवढी कमी नव्हती. यापुढे, आपण डोक्याचा वापर करून आता कमवण्यासाठी काम करू असा निर्णय त्याने घेतला. तसेच चक्क बूट पॉलिश किट घेऊन रस्त्यावर उतरला.
shoe3
बूट पॉलिशने कमाई करण्यासाठी जॉन ट्रिक्स वापरतो. तो सर्वप्रथम दररोज आपल्या दुकानासमोरून जाणाऱ्या लोकांच्या घाणेरड्या बूटांवर कमेंट करतो. त्यांच्याशी बातचीत करताना तो त्यांच्या बूटांबद्दल सांगतो. अनेक जण अहंकार दुखावल्याने वेळीच बूट पॉलिशसाठी तयार होतात. जॉनने सांगितल्याप्रमाणे, त्याचे काम मासेमारी करण्यासारखे आहे. अशाच पद्धतीने तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो.
shoe4
जॉनच्या अनेक टीव्ही चॅनल आणि दैनिकांनी सुद्धा मुलाखती घेतल्या आहेत. त्यानुसार, जॉन येणाऱ्या-जाणाऱ्या अनोळखी लोकांसोबत मैत्री करतो. त्यांना जोक ऐकवतो. त्यांच्यासोबत हसतानाच तो घाणेरड्या बूटांकडे बोट दाखवतो. यानंतर आपण पॉलिश करू शकतो असे तो सांगतो. आता जॉनचे असेही काही ग्राहक बनले आहेत जे रोज न चुकता बूट पॉलिश करून घेतात.

Leave a Comment