पाकच्या नाकीनऊ आणणारे असे आहे हवाई दलाचे ‘मिराज 2000’

mirage
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला भारताने घेतला असून भारताने पाकिस्तानवर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन, भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचा बॉम्ब फेकला. तसेच, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताचे लढाऊ विमानही शिरल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला आहे. पाकिस्तानवर 12 मिराज 2000 विमानांनी हल्ला केला आहे. तेच मिराज 2000 नेमके आहे कसे ते जाणून घेऊया.
mirage1
मिराज हे हवाईदलातील लढाऊ फायटर विमान आहे. या विमानांचे डिझाईन 1970 साली तयार करण्यात आले होते. ही विमाने फ्रेंच एअर फोर्समध्ये वापरली जातात. ही विमाने Dassault Aviation या कंपनीने तयार केली आहेत. या विमानांचा वापर हवाई हल्ल्यासाठी करण्यात येतो. यासोबतच फ्रेंच एअर फोर्सच्या व्यतिरिक्त भारत, चायना युनायटेड अरब इमिरेट्स या देशातही या विमानांचा वापर करण्यात येतो.
mirage2
मिराज 2000 हे फ्रेंच मल्टीरोल विमान आहे. यामध्ये सिंगल इंजिन असेलेले हे फायटर विमान आहे. तसेच चार या विमानांचे 1Mirage 2000C, Mirage 200B, Mirage 2000N, Mirage 2000D, Mirage 2000-5F असे व्हिरेअंट आहेत. 29 जून 1985 साली भारताने सर्वात पहिल्यांदा सात मिराज 2000 ही फायटर विमान खरेदी केली होती.

Leave a Comment