टाटाच्या अल्ट्रोझ हचबॅक कारचा टीझर रिलीज

tata
दिल्ली ऑटो एक्स्पो मध्ये टाटाने ४५ एक्स नावाने सादर केलेल्या कन्सेप्ट कारचे नामकरण अल्ट्रोझ असे करण्यात आले असून पुढच्या आठवड्यात जिनेव्हा ऑटो शो मध्ये ती सादर केली जाणार आहे. ही प्रीमियम हचबॅक या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत बाजारात दाखल होईल असे समजते. अॅन्यूअल ऑटो शो मध्ये ती ५ मार्च ला सादर केली जाणार आहे.

कंपनीचे प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयंक पारीख या संदर्भात माहिती देताना म्हणाले, नव्या कारच्या नावाची घोषणा झाल्याने आमचा उत्सव वाढला आहे. अल्ट्रोझ नावाचा एक समुद्री पक्षी असून तो न थांबता कितीही अंतर उडू शकतो. त्यावरून हे नाव दिले गेले आहे. कारचे डिझाईन उत्तम आहेच पण तिचा वेग आणि क्षमताही उत्तम आहे.

altroz
या कारला १.५ लिटर डीझेल इंजिन तसेच मॅन्युअल आणि ऑटो ट्रान्समिशन दिले गेले असून क्लासिक लीडिंग कनेक्टीव्हिटी व मोबिलिटी फीचर्स दिले गेले आहेत. टच स्क्रीन इन्फोन्टेनमेंट सिस्टीम दिली गेली आहे. या कारची किंमत साधारण १० लाखाच्या आसपास असेल असे समजते.

Leave a Comment