शाओमीच्या मी ९ ला १० लाखाहून अधिक प्रीबुकिंग

mi9
शाओमी मी ९ स्मार्टफोन चीन मध्ये लाँच होताक्षणी ग्राहकांच्या त्यावर उद्या पडल्या असून लाँचिंगला २४ तास पूर्ण होण्याअगोदर प्रीबुकिंग केलेल्या ग्राहकांची संख्या १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. २६ फेब्रुवारी पासून हा फोन ऑनलाईन तसेच ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजची किंमत २९९९ युआन म्हणजे ३१८०० रुपये तर ८ जीबी रॅमची किंमत ३२९९ युआन म्हणजे ३४९०० रुपये आहे.

शाओमीचा हा पहिलाच फ्लॅगशिप प्रीमियम फोन असून तो ५ जीला सपोर्ट करेल असे सांगितले जात आहे. या फोनसाठी ६.३९ इंची एमोलेड वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिला गेला असून क्वालकॉम नेक्स्ट जनरेशन ८५५ प्रोसेसर आहे. या फोनला रिअरला ४८ एमपीचा प्रायमरी, १६ एमपीचा वाईड अँगल आणि १२ एमपीचा टेलीफोटो सेन्सर ट्रिपल कॅमेरा असून २० एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. कॅमेर्यांना सफायर ग्लास फिनिश असून त्यामुळे चरे पडण्याचा धोका नाही. कॅमेरा स्लो मोशन व्हिडीओ ला सपोर्ट करण्यास सक्षम आहे असे समजते.

Leave a Comment