आता केसांवरून करता येणार शरीरातील ड जीवनसत्वाच्या पातळीचे परीक्षण

vitamin
आता एखाद्याच्या शरीरातील जीवनसत्वाच्या पातळीचे परीक्षण त्या व्यक्तीच्या केसांवरूनही करता येणे शक्य असल्याचे निदान वैज्ञानिकांनी अलीकडेच यशस्वी रित्या केलेल्या संशोधनाअंती केले आहे. यामुळे शरीरातील ड जीवनसत्वाची पातळी आता सहज मोजता येणे शक्य झाले आहे. जगभरामध्ये सुमारे एक बिलियन लोकांपेक्षाही अधिक जनसंख्येमध्ये ड जीवनसत्वाच्या अभावाने अनेक तऱ्हेच्या समस्या उद्भवित आहेत. शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता मानसिक नैराश्याला, हृदयाशी निगडित समस्या, मधुमेह आणि कर्करोगासारख्या विकारांना आमंत्रण ठरू शकते.
vitamin1
शरीरातील ड जीवनसत्वाची कमतरता रक्ततपासणीच्या द्वारे करता तपासता येत असली, तरी या तपासणीमध्ये तत्क्षणी असलेली ड जीवनसत्वाच्या पातळीचे निदान केले जाऊ शकते. मात्र केसांची लांबी दर महिन्यामध्ये एक सेंटीमीटर वाढत असून, अनेक महिन्यांपासून असलेली ड जीवनसत्वाची कमतरतेचे यावरून निदान करता येऊ शकते. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाच्या अनुसार ड जीवनसत्वाची पातळी रक्तामध्ये जास्त असल्यास हे जीवनसत्व केसांमध्येही मोठ्या प्रमाणात साठविले जात असते, तर रक्तामध्ये याची पातळी कमी असल्यास केसांमध्येही याचे प्रमाण कमी आढळते.
vitamin2
ड जीवनसत्वाची पातळी शरीरामध्ये किती आहे हे जाणून घेण्यासाठी केसांचा नमुना चाचणीसाठी पाठविल्यास अनेक महिन्यांमध्ये ड जीवनसत्वाच्या पातळीमध्ये झालेले चढउतार समजू शकतात हे निदान ‘न्यूट्रीयंट्स’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. केस दाट असणे, किंवा पातळ असणे, तसेच केसांवर लावले जाणारे कृत्रिम रंग आणि इतर रसायनांमुळे या चाचणीमध्ये थोडीफार तफावत येऊ शकत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment