चाबहार बंदरातून अफगाणी सुका मेवा भारताकडे रवाना

chabahar
रविवारी चाबहार या इराणी बंदरातून अफगाणीस्तानतून ५७ टन सुका मेवा, कापड, कार्पेट आणि मिनरल उत्पादने भारताकडे रवाना करण्यात आली. या सामानाने भरलेले २३ ट्रक अफगाणीस्थानातून रस्ता मार्गाने इराणच्या या बंदरात आले आणि तेथून जहाजाने हा माल भारताच्या मुंबई बंदरात पाठविला गेला. अफगाणिस्थानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी भारत, अफगाणिस्थान आणि इराण या देशातील संबध उत्तम असल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले.

चाबाहर बंदरामुळे पाकिस्तानला बायपास करून भारताला इराण आणि अफगाणिस्थान यांच्याबरोबर व्यापार करणे शक्य झाले आहे. भारताने हा मार्ग विकसित करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. अमेरिकेने राजकीय दृष्ट्या महत्वाच्या इराणी चाबहार बंदराचा भारताने विकास करावा यासाठी काही प्रतिबंधातून भारताला सवलत दिली होती. त्यात या बदरापर्यंत माल आणण्यासाठी उभारायच्या रेल्वे लाईनचा समावेश होता. भारताने याच बंदरातून अफगाणिस्थानला ११ लाख टन गहू आणि २ हजार टन मसूर डाळ निर्यात केली आहे.

Leave a Comment