पोर्न इंडस्ट्रीशी निगडीत हैराण करणा-या गोष्टी

porn
पॉर्न इंडस्ट्रीने सध्याच्या घडीला जगभरात आपली पाळेमुळे रोवली आहेत. याच्या माध्यमातून अनेक कंपन्या अब्जावधींची माया जमा करत आहेत. पण आपल्यापैकी थोड्याच लोकांना या इंडस्ट्रीबद्दल माहिती आहे. अनेकांना या उद्योगाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पॉर्न चित्रपटांची इंटरनेटवर सर्वाधिक मागणी आहे. या उद्योगाची व्याप्ती आणि कमाईची आकडेवारी थक्क करणारी असून पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित अनेक वेबसाईट, संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ते खुलासे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
porn1
पोर्न इंडस्ट्रीशी निगडीत अनेकजण फक्त पदवीधर नाही तर मास्टर्स डिग्री होल्डर असतात. पोर्न स्टार जोएना एंजेल इंग्लिश लिटरेचर डिग्री होल्डर आहे. तर ए.जे बेलीने दोन-दोन विषयांत मास्टर्स केले आहे. पोर्न स्टार्सनी सांगितल्यानुसार, एखाद्या सार्वजनिक ते जेव्हा ठिकाणी जातात, तेव्हा लोक त्यांना ओळखतात. काही लोकांना चांगला अनुभव येतो, तर काहींना मात्र लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो.
porn2
जे कपडे पोर्न स्टार्सनी व्हिडिओत परिधान केलेले असतात ते अतिशय महागडे असतात. काही स्टार्स त्यांच्या कपड्यांची ऑनलाइन विक्री करतात.त्याबरोबर या क्षेत्रात प्रवेश करणे सोपे नसते. या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी लोकांना जास्तीत जास्त पेपर वर्क करावे लागते. ऑस्ट्रेलियात पोर्न इंडस्ट्री ही सर्वाधिक महिलांच्या मालकिची आहे. हे ऐकून जरा विचित्र वाटेल, पण सत्य हेच आहे. पुरुषांच्या तुलनेत या प्रोफेशनमध्ये काम करणा-या महिलांना अधिक पैसे मिळतात.
porn3
या इंडस्ट्रीत काम करणारे अनेक पोर्न स्टार्स त्यांच्या कामाला कंटाळलेले असतात. त्यामुळे ते हे काम सोडून दुसरे काम करतात. एखादा व्हिडिओ 30 सेकंदांचा असला तरी त्याला 20 रिटेकनंतर ओके केले जाते. स्वतःचे व्हिडिओज पोर्न स्टार्स बघणे पसंत करत नाहीत. शूट झाल्यानंतर फक्त एडिटिंगच्या वेळीच ते थोडे त्याकडे लक्ष देतात. एका पोर्न स्टारने वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो जेव्हा लोकांना पोर्न स्टार असल्याचे सांगतो, तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे अनेकदा तो शिक्षक असल्याचे खोटे सांगत असतो.
porn4
अनेक पोर्न इंडस्ट्री त्यांच्या कलाकारांना कंडोम वापरु देत नाही. त्याचबरोबर जर एखाद्या महिलेने तिच्या सहकलाकाराला कंडोम वापरण्यास सांगितल्यास, तिची इंडस्ट्रीतील मागणी कमी होते. पॉर्न चित्रपटांत काम करणारे अनेक कलाकार एकमेकांना ओळखत नाहीत. ते एकमेकांना शूटिंगच्या तासाभरापूर्वी भेटतात. पोर्न चित्रपटात काम करणारे अनेक जण विवाहित असतात. पण विवाहित असल्याचे ते उघड होऊ देत नाहीत. सायबर थ्रेटमध्ये पोर्न साइट इतर साध्या साइटपेक्षा जास्त सुरक्षित असतात.
porn5
दरम्यान उत्तर कोरिया आणि ईराणमध्ये पोर्न चित्रपट बघणे गुन्हा असून त्यासाठी मृत्यूदंड दिला जातो. काही पोर्न स्टुडिओ अशा लोकांना हायर करतात, जे शूटिंगपूर्वी पोर्न स्टारला उत्तेजित करण्याचे काम करतात. अशा लोकांना फ्लफर म्हटले जाते. हार्डकोर पोर्न व्हिडिओ ज्या देशांत रेकॉर्ड केले गेले, तेथे सेक्स क्राइम रेट कमी मिळाला आहे. पोर्न इंडस्ट्रीतून मिळणारे उत्पन्न हे फुटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉल इंडस्ट्रीतून मिळणा-या उत्पन्नापेक्षा अधिक असते. पॉर्न इंडस्‍ट्रीत काम करणा-या 80 टक्के लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत लैंगिक आजार होत नाहीत. कंडोमचा वापर कमीत कमी करुनदेखील त्यांना हे आजार होत नाहीत. जगभरात तीन कोटी लोक पोर्न बघतात. इंटरनेटवर एकुण डाऊनलोडमध्ये 35 टक्के पोर्न कंटेंट डाऊनलोड केला जातो.

Leave a Comment