दत्तक घेतलेल्या मुलींचा प्रिती झिंटाला पडला विसर

pretiy-zinta
2009 साली अभिनेत्री प्रिती झिंटाने तब्बल 34 मुलींना दत्तक घेत त्यांची सर्व जबाबदारी घेतली होती. पण सध्या असे वृत्त आहे की, दत्तक घेतलेल्या मुलींचा सध्या प्रिती झिंटाला विसर पडला आहे. दत्तक घेतल्यापासून ती कधीच त्यांची विचारपूस करायला जात नाही आणि त्यांचा खर्चही देत नाही.

याबाबत उत्तराखंडाच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलच्या संस्थापिका शाइला इत्तेफाम यांनी सांगितल्यानुसार, प्रिती 34 मुलींचे पालन पोषण आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे वचन दिली होते पण आता तिला तिच्या वचनाचा विसर पडला आहे. शाइला पुढे सांगतात की, अनेक वर्षांपासून प्रिती शाळेतही आलेली नाही. तिच्या वागण्यामुळे स्कूल मॅनेजमेंट नाराज आहे.

प्रितीने लग्नापुर्वी 2009साली आपल्या 34 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या शाळेत शिकणा-या विद्यार्थिनींना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिला यासाठी परवानगी देखील देण्यात आली होती. अनाथ मुलींना तिने दत्तक घेतले होते. ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत येथे आली होती. शाइना म्हणते की, काही वर्षापुर्वी ती शाळेत आली, तेव्हा फक्त मुलींसोबत फोटो काढून निघून गेली.

Leave a Comment