हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती ज्युलिया रॉबर्ट्‌स

julia-roberts
२८ ऑक्टोबर १९६७ रोजी जॉर्जियामध्ये सौंदर्याची खाण असलेली प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सचा जन्म झाला. तिची आई बॅटी लू ब्रेडेमास हीदेखील अभिनेत्रीच होती. आपले पती वॉल्टर ग्रेडी रॉबर्ट्स यांच्यासोबत ती अभिनयाचे क्लासेस चालवत होती. ज्युलियाशिवाय कुटुंबात दोन एरिक आणि लिसा ही दोन मुलेही होती. आपल्या आईप्रमाणे सर्वच मुले हॉलीवूडचे अभिनेतेच झाले. ज्युलियाच्या जन्मानंतर तिच्या आईला आपले काम सोडावे लागल्यामुळे त्यांचे कुटुंब खूप अडचणीत आले. कॉरेटा स्कॉट किंग या विधवेने ज्युलियाच्या कुटुंबियाची परिस्थिती पाहून त्यांची खूप मदत केली. तिनेच बॅटीच्या आजारपणाचा खर्च देखील केला.
julia-roberts1
ज्युलिया पाच वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. ज्युलियाला आपण प्राण्यांशी चांगला संवाद करू शकतो, असे वाटत असल्यामुळे आपण प्राण्यांचे डॉक्टर व्हावे, असे स्वप्न ती पाहात असे. आपण काही वेगळे करावे, असे तिला शाळेमध्ये असतानाही वाटत होते. पण तिच्याकडे काही खास कौशल्य नव्हते. आपला भाऊ एरिक रॉबर्ट्समुळे प्रेरित होऊन अनेक वेळा स्थानिक नाट्य कार्यक्रमात ती सहभाग घेत असे. तिच्या वडिलांचे ती दहा वर्षांची असताना कॅन्सरमुळे निधन झाले.
julia-roberts2
आपले वडील कॅन्सरने आजारी आहेत, हे तिला त्यांच्याशी रोज फोनवर चर्चा करून जराही जाणवले नाही. एका मुलाखतीत दरम्यान ती म्हणते की, मी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याशी स्वप्नात बोलत होते. नेमके याच काळात ज्युलियाला अडखळत बोलण्याची नवीनच समस्या निर्माण झाली. ही समस्या आनुवंशिक असल्याने ती याबद्दल बोलायलाही तयार नसे. जेव्हा तिला वर्गात काही वाचायला सांगितले जात असे तेव्हा तिचे अडखळत बोलणे हास्यास्पद ठरत असे. तिने रोज मोठ्याने वाचून ही कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करत असे. शेवटी तिने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर या समस्येवर विजय मिळवला.
julia-roberts3
ज्युलियाने वयाच्या तेराव्या वर्षी पिज्जोरिया नावाच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. ती शाळेच्या शिक्षणाबरोबरच रिकाम्या वेळेत चपलांच्या दुकानात काम करत असे. यानंतर तिने स्नॅक बार आणि कॅफेमध्येही काही काळ काम केले. तिने शाळा संपल्यानंतर जॉर्जिया विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. पण यात तिला यश आले नाही. यानंतर ती आपली बहीण लिसा हिच्याकडे न्यूयॉर्कला आली. तिने तेथे जाऊन अभिनयाचे क्लासेस सुरू केले.
julia-roberts4
एरिक या तिच्या भावाने तिला १९८७ साली ‘ब्लड रेड’ नावाच्या चित्रपटात एक छोटा रोल देऊ केला. ही भूमिका पार पाडण्यासाठी तसा फार अभिनय करण्याची गरज नव्हती. ज्युलियाने यानंतर सॅटिफॅक्शन चित्रपटात रॉक सिंगरची भूमिका केली. तिला ही भूमिका करण्यासाठी काही वाद्येही शिकावी लागली. ज्युलियाला त्याच वर्षात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ‘मिस्टिक पिज्जा’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. ज्युलियाने यात वेट्रेसचे काम केले होते. यानंतर आला ‘स्टील मॅग्नोलियाज’ सहा महिलांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम केले. यात शेलबीची भूमिका ज्युलियाने केली. तिला या भूमिकेसाठी गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. १९८९ मध्ये हॅरी मार्शलचा प्रिटी वुमन आला. त्यात रिचर्ड गेयर हे मुख्य अभिनेते होते. या चित्रपटासाठी ज्युलिया पहिली पसंत नव्हती. ही एक वेश्येची भूमिका होती. हा रोल अनेक नामवंत नट्यांनी नाकारला होता. ज्युलियाला हा रोल शेवटी मिळाला आणि तिने यानंतर मागे वळून पाहिले नाही. याच चित्रपटाने ज्युलियाला स्टार बनवले. यानंतर तिला अनेक मोठे रोल मिळाले.

Leave a Comment