25 वर्षांनंतर पुन्हा एकदा नवरी बनणार पूजा बेदी

pooja-bedi
घटस्फोटच्या तब्बल 16 वर्षांनतर 48 वर्षीय अभिनेत्री पूजा बेदीने बॉयफ्रेण्ड मानेक काँट्रॅक्टर याच्यासोबत साखरपुडा केला असून याचवर्षी या दोघांच्या लग्नाचा बार उडणार आहे. व्हॅलेन्टाईन्स डेच्या दिवशी मानेक काँट्रॅक्टरने पूजाला प्रपोज केले होते. त्यासाठी तो तिला हॉट-एअर बलून राईडसाठी घेऊन गेला होता आणि त्याने तिथेच पूजाला लग्नाची मागणी घातली. दोघे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते.
pooja-bedi1
मानेक काँट्रॅक्टर हा पूजाचा शाळेपासूनचा मित्र असून दोघांचे शिक्षण हिमाचल प्रदेशच्या द लॉरेन्स स्कूल सनावर येथे झाले. मानेक शाळेत पूजाला सीनियर होता. पण दोघेही शालेय जीवनानंतर आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. मानेक काँट्रॅक्टर मूळचा गोव्याचा आहे. त्यांची मागील वर्षी पुन्हा भेट झाली. दोघांमध्ये प्रेम झाले आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.
pooja-bedi2
लग्नाचे प्लॅनिंग मुलगा आणि मुलीच्या सुट्टीच्या हिशेबाने करणार असल्याचे पूजाने सांगितलं. मुलगी आलिया तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर मुलगा उमर इब्राहिम कॉलेजमध्ये आहे. दोघांच्या सुट्टीनंतर लग्नाची तारीख निश्चित होईल, असे तिने सांगितले.

Leave a Comment