पाकिस्तान सरकारने जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला ठोकले टाळे

masud-azhar
नवी दिल्ली – पाकिस्तान सरकारने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला टाळे ठोकले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये हे मुख्यालय असून मौलाना मसूद अझहर या संघटनेचा म्होरक्या असल्याचे सांगितले जात आहे.

पंजाब प्रांताच्या गृह खात्याच्या माहितीनुसार, मध्य-उल-असबारचा मदरसा आणि परिसरातील सजनाह-उल-इसलाम ही मशीद पंजाब सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहे. जैश-ए-मोहम्मदचे ही मशीद मुख्यालय मानली जाते. एक प्रशासकीय अधिकारी या परिसरावर नियंत्रणासाठी नेमण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारच्या एका निवेदनानुसार या मदरशात 70 शिक्षक आणि 600 विद्यार्थी आहेत. सध्या या परिसराचा ताबा पंजाब सरकारकडे असल्याचे त्यांनी सांगितले. मदरशाच्या कर्मचाऱ्यांनीही या संस्थानाला कुलूप ठोकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या येथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Comment