पाकिस्तानात दिसू लागला भारताच्या कारवाईचा प्रभाव

pakistan
नवी दिल्ली : पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात देशात संतापाची लाट असल्याची पाहायला मिळत असतानाच देशातील अनेक ट्रेडर्स आणि शेतकऱ्यांनी पाकिस्तानात आपला माल पाठवणे बंद केले आहे. भारताने पाकिस्तानात निर्यात करण्यात येणाऱ्या सामानावर बेसिक कस्टम ड्युटी 200 टक्क्यांनी वाढवली आहे. त्याचबरोबर भारतीय शेतकऱ्यांनी पिकवलेला माल पाकिस्तानात पाठवण्यासाठी नकार दिला आहे.

पाकिस्तानला टोमॅटो पाठवण्यास मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार दिला असून आमचे टोमॅटो येथे पडून सडून गेले तरी चालतील परंतु पाकिस्तनाला पाठवणार नाहीत, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानात याचा परिणाम दिसून येत आहे, कारण तेथे टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले आहेत. याची माहिती साऊथ एशियाच्या एका पत्रकाराने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर दिली आहे.

टोमॅटोचे भाव पाकिस्तानात आकाशाला भिडले आहेत. लाहोरमध्ये टोमॅटोची 180 रु प्रति किलोने विक्री होत आहे. याउलट भारतामध्ये टोमॅटो 10 रु. किलो मिळत आहेत. पाकिस्तानला सर्वात जास्त फळे आणि भाज्या पाठवणाऱ्या अझादपूर मंडई व्यापाऱ्यांनी पाकिस्तानात माल पाठवण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार अटारी-वाघा मार्गावर येथून दररोज 75 ते 100 ट्रक टोमॅटो जात होते, परंतु या घटनेनंतर ट्रेडर्सने सप्लाय बंद केला आहे.

पाकिस्तानात टोमॅटोप्रमाणेच इतर भाज्याही महाग झाल्या आहेत. पाकिस्तानातील भाजीमंडईमध्ये बटाट्याचे भावही वाढले आहेत. 18 फेब्रुवारीच्या भावानुसार बटाटे 30-35 रुपये किलो विकत आहेत. पूर्वी हे 10-12 रुपये प्रति किलो होते. काकडी आणि दोडका 80 किलो प्रति विक्री होत आहे.

Leave a Comment