नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील

vishwas-nagare
नाशिक : कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून रवींद्र सिंघल यांच्या जागी विश्वास नागरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील हे दोन्हीही कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.

नाशिक पोलिस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्त झाल्यानंतर, कोल्हापूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची नियुक्ती कुठे झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि कार्यतत्पर आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते मूळचे सांगली जिल्ह्यामधील शिराळा तालुक्यातील कोकरुड गावचे रहिवाशी आहेत. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता. म्हणून आजही त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतात. विश्वास नांगरे पाटील हे स्पर्धा परीक्षा करुन पोलीस सेवेत येऊ पाहणाऱ्यांचे रोल मॉडेल आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर(अतिरिक्त) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग, पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र ही पदे भूषवली आहेत.

Leave a Comment