चर्चा केली असती तर तुमचे तीन घटस्फोट झाले नसते

ram-gopal-verma
जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील प्रत्येकाकडून बदला घेण्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यात भारताने या समस्येवर चर्चा करून तोडगा काढवा असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याने दिला होता. इम्रान खान याच्या सल्ल्याचा आपल्या देशात कायमच चर्चेत असणारे राम गोपाल वर्मा यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.


आपल्या ट्विटरच्या माध्यमातून रामगोपाल यांनी सगळेच प्रश्न जर चर्चेने सुटत असते तर तुमचे तीन घटस्फोट झाले नसते असे म्हणत इम्रान खान यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात इम्रान खान याने आपली बाजू मांडली होती. आमचा या हल्ल्यात कोणताही सहभाग नव्हता. भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आम्हाला पुरावे द्यावेत. आम्ही नक्की कारवाई करू. तसेच, भारताने आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केल्यास त्याला योग्य उत्तर देऊ, अशी धमकीही इम्रान खान यांनी दिली होती.

Leave a Comment