नॅशनल वॉर मेमोरियलचे २५ फेब्रुवारीला उद्घाटन

memorial
कोणत्याची देशाचे सैनिक त्या देशाचे आधारस्तंभ असतात. त्यांच्या शिवाय देशवासीय शांत आयुष्य आणि बिनघोर झोप घेऊ शकत नाहीत. असे म्हणतात कि रात्री सैनिक देशाच्या सीमेवर जागे असतात म्हणून नागरिक रात्रीची शांत झोप घेऊ शकतात. स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्र मिळाल्यावरही अनेक लढाया लढल्या गेल्या आणि त्यात या जवानांनी आपले रक्त वाहविले. या प्रत्येकाची नावेही आपल्याला माहिती नसतात. अश्या अनाम वीराच्या समर्पण आणि शौर्याच्या कहाण्या सांगणारे नॅशनल वॉर मेमोरियल दिल्लीत तयार झाले असून त्याचे उद्घाटन २५ फेब्रुवारीला होणार आहे.

वास्तविक असे मेमोरीयल उभारण्याचा प्रस्ताव ६० वर्षापूर्वी मांडला गेला होता. मात्र लाल फीत आणि सरकारी उदासीनता यामुळे हे काम होऊ शकले नव्हते. आता १७८ कोटी रुपये खर्चून ४० एकर जागेत हे मेमोरियल उभारले गेले आहे. २२६०० शहीद सैनिकांच्या सन्मानार्थ याची उभारणी केली गेली असून यामुळे सैन्य दलाची दीर्घकाळाची भावनिक गरज असेलली मागणी पूर्ण झाली आहे.

भारत हा नॅशनल वॉर मेमोरियल नसलेला जगातील बहुदा पहिलच देश होता. यापूर्वी पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या ८४००० शहीद सैनिकांची आठवण म्हणून इंग्रजांनी इंडिया गेटची उभारणी केली तसेच १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या ३८४३ सिनिकांची आठवण म्हणून अमर जवान ज्योत या स्मारकात उभारली गेली होती.

नॅशनल वॉर मेमोरियल मध्ये अमरचक्र, वीरचक्र, त्यागचक्र, रक्षाचक्र ज्योती तेवणार असून त्यामागे सैनिकांचे बलिदान आम्ही विसरलेलो नाही याची आठवण आहे. गोलाकारात १५ मीटर उंच स्मारक स्तंभ उभारला गेला असून भित्ती चित्रे, ग्राफिक्स आणि शहिदांची नावे कोरली गेली आहेत. तसेच परमवीर चक्र मिळालेल्या २१ सैनिकांच्या मूर्ती बसविल्या गेल्या आहेत.

Leave a Comment