चोरट्यांनी मारला व्होडका कंपनीच्या कोट्यावधीच्या पाण्यावर डल्ला

vodka
आजवर तुम्ही चोरट्यांनी दागिणे, पैसे, मोबाईल किंवा एखादी कार चोरल्याच्या बातम्या ऐकल्या किंवा पाहिल्या असतील पण आम्ही आज तुम्हाला अशा चोरी बद्दल सांगणार आहोत ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. जगात एक असा देश आहे जेथील चोरांनी चक्क कोट्यावधी किंमत असलेल्या पाण्यावरच डल्ला मारला आहे. विश्वास नाही ना बसत पण अशी घटना खरोखर घडली आहे.
vodka4
ही विचित्र चोरी कॅनडातील न्यूफाउंडलँडमध्ये घडली आहे. तेथील चोरांनी काही दिवसांपूर्वी एका व्होडका बनवणाऱ्या कंपनीचे 30 हजार लीटर पाण्याची चोरी केली आहे. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष? तर चोरट्यांनी ज्या पाण्यावर डल्ला मारला ते सामान्य पाणी नव्हते. ते पाणी आईसबर्गचे होते. हे पाणी अत्यंत शुद्ध असते असे म्हटले जाते आणि त्याचा वापर महागडी व्होडका आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी केला जातो. दरम्यान चोरट्यांनी आईसबर्गच्या पाण्यावर डल्ला मारला त्याची किंमत 8.5लाख डॉलर ऐवढी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
vodka1
सध्या या चोरांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना संशय आहे की, हे एका व्यक्तींच काम नाही. टोळीने हे काम केले असेल आणि चोरांनी ही चोरी एका दिवशी नाही तर हळूहळू केली. पोलिसांना असाही संशय आहे की, चोरांना पाण्याचे कंटेनर्स आणि त्याचे महत्त्व माहीत असल्यामुळे ही चोरी कंपनीतीलच काही लोकांनी केल्याचा संशय त्यांना आहे.
vodka5
याबाबत माहिती देताना कंपनीचे सीईओ डेविड मायर्स म्हणाले की, सगळे या चोरीत नसतीलही पण निदान एक तरी व्यक्ती सहभागी असावा. कारण पूर्ण टँक त्याच्या मदतीशिवाय रिकामा केला जाऊ शकत नाही. याचे कारण कंटेनरच्या लॉक्सचे पासवर्ड बाहेरच्या लोकांना माहीत होऊ शकत नाहीत.
कंपनीशी निगडीत लोकांनी पोलिसांना सांगितले की, चोरी खरंच हैराण करणारी आहे. कारण टॅंकर्स फार सुरक्षेत ठेवले जातात. आणि सतत त्यांच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक राहतात. ही घटना स्टाफ सुट्टीवर असण्यादरम्यान झाली असावी. सुट्टीनंतर स्टाफ परत आला तेव्हा टँकरमध्ये पाण्याचा एक थेंबही नव्हता.
vodka3
कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, आईसबर्गपासून पाणी काढण्याची प्रक्रिया फार कठीण असते. आधी तर सरकारकडून याची परवानगी घ्यावी लागते. नंतर काही जाळी, हायड्रॉलिक मशीन्स, रायफल आणि कापण्यासाठी मशीन्स घेऊन आईसबर्गला तोडले जाते. तुकड्यांना स्पीड बोटच्या मदतीने किनाऱ्यावर नेलं जातं. शेवटी वाफेने हे तुकडे स्वच्छ करून वापरण्यालायक केले जातात.

Leave a Comment