सौदीच्या प्रिन्सला पाकिस्तानने भेट दिली महागडी बंदूक

saudi
आपल्याला नव्याने सांगायला नको की काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे भारत दौऱ्यावर आले होते. पण त्यांनी त्याआधी पाकिस्तानला देखील भेट दिली. या दरम्यान त्यांना पाकिस्तानने एक गोल्डप्लेटेड बंदूक भेट म्हणून दिली होती. अशा प्रकारे बंदुक एका राष्ट्राध्यक्षाला भेट म्हणून देण्याची कदाचित पहिलीच वेळ असावी. जेव्हा कोणत्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष कुठल्याही देशाला भेट देतात तेव्हा त्यांच्या पाहुणचारासोबतच त्यांना काही ना काही भेटवस्तू दिली जाते.
saudi1
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जर्मनीच्या एका इंजिनिअरने हेकलर अ‍ॅन्ड कोड एमपी५ एक सबमशीन गन तयार केली असून तिला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. सौदीच्या प्रिन्सला या बंदुकीसह एक पोट्रेटदेखील भेट म्हणून देण्यात आले. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात या भेटीदरम्यान २० बिलियन डॉलरच्या गुंतवणूकीचा करार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या तुरूंगातील २ हजार पाक कैद्यांची सुटका करण्यात येईल अशी घोषणा देखील सौदी प्रिन्सने केली. तसेच प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचे पाकिस्तानने जोरदार स्वागत करत त्यांना 21 तोफांची सलामी देखील दिली होती.