दीपिकाने शेअर केलेले ‘बेडरूम सिक्रेट’ ऐकून रणवीरही थक्क

deepveer
बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून ओळख असलेले दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे लग्नानंतर अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. दोघेही नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार समारंभात स्टायलिश लूकमध्ये एकत्र आले होते.
deepveer1
दीपिकाला या पुरस्कार सोहळ्यात वुमन ऑफ द इयर हा पुरस्कारही मिळाला. तिने यावेळी लग्न आणि नवऱ्यासोबतच्या नात्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. दीपिका या सगळ्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना असे काही म्हणाली की ते ऐकून रणवीर सिंह देखील थक्क झाला.
deepveer2
रणवीरच्या स्टाइल आणि ब्युटी सिक्रेटबद्दल दीपिकाला विचारले असता ती म्हणाली की, रणवीर आंघोळ आणि टॉयलेटलाही त्याचा सर्वात जास्त वेळ जातो. दीपिका पुढे म्हणाली की, बेडमध्येही तो सर्वाधिक काळ असतो. सगळेच दीपिकाच्या या बोलण्यावर हसू लागले. दीपिकाचे हे बोलणे ऐकून रणवीर तिच्याजवळ धावून गेला आणि तिला मध्येच थांबवले.
deepveer3
दीपिकाला यावेळी कळले की बोलताना तिने नीट वाक्य न वापरल्यामुळेच नंतर ती आपले विधान दुरूस्त करताना म्हणाली की, मला असे म्हणायचे आहे की, तो फोनवर एवढा व्यस्त असतो की लवकर झोपत नाही.
deepveer4
दीपिका रणवीरच्या स्टाइलबद्दल म्हणाली की, रणवीर जेव्हाही कुठे जाण्यासाठी कपड्यांची निवड करतो, तेव्हा तो माझ्या संमतीनेच कपडे घालतो.

Leave a Comment