परीक्षा आर्चीची अन् त्रास पोलीसांना

rinku-rajguru
आज बारावीच्या परीक्षा सुरु होत असून या परीक्षेला सैराटमधील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु देखील बसणार आहे. रिंकू सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीमधील परीक्षा केंद्रातून बारावीची परीक्षा देणार आहे. पण यावेळी तिचे स्टारडम आडवे येऊ नये आणि परीक्षा केंद्रावर तिच्या चाहत्यांची होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक परीक्षा केंद्र संचालकांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बंदोबस्ताच्या मागणीसाठी अर्ज केला आहे.

त्यानुसार आज टेंभुर्णीच्या तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कारण महाराष्ट्राची आर्ची अर्थात रिंकू राजगुरु पेपर देण्यासाठी या महाविद्यालयात येणार आहे. रिंकूने बहिस्थ विद्यार्थी म्हणून बारावीचा फॉर्म भरला असून, ती तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयाच्या केंद्रातून पहिला पेपर देणार आहे. रिंकूच्या चाहत्यांचा उपद्रव होऊ नये, म्हणून प्राचार्या जयश्री सातपुते यांनी अधिकाधिक बंदोबस्त देण्याची मागणी टेंभुर्णी पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Comment