पाकिस्तानी कैद्याची भारतीय कैद्यांनी केली ठेचून हत्या

pakistani
जयपूर – सध्या देशभरात पुलवामा हल्ल्यामुळे संतापाची लाट आहे. देशभरातील नागरिक बदला घ्या अशी भावना व्यक्त करत असतानाच जयपूर मध्यवर्ती कारागृहात भारतीय कैद्यांनी पाकिस्तानच्या कैद्याची ठेचून हत्या केली आहे.

या पाकिस्तानी कैद्याची हत्या बरॅकमध्ये टीव्ही पाहण्याच्या वादातून झाल्याचे येत आहे. इतर कैद्यांसह पाकिस्तानी कैदी शाकिर उल्ला बरॅकमध्ये टीव्ही पाहत होता. त्यादरम्यान आवाज कमी-जास्त करण्याच्या कारणावरुन कैद्यांमध्ये वाद झाला होता. शाकीर याचा यानंतर झालेल्या मारहाणीत जागीच मृत्यू झाल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मण गौड यांनी सांगितले.

या कैद्याला केवळ मारहाण झाली की, धारदार शस्त्राने वार करण्यात आले, याविषयी चौकशी सुरू आहे. २०११साली यूपीए (अनलॉफुल अॅक्टिव्हिटी) कायद्यांतर्गत शाकीर याला अटक करण्यात आली होती. त्याच्यासह आणखी ८ कैदी होते. हे सर्व पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंधित असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ७ वर्षे खटला चालल्यानंतर नोव्हेंबर २०१७मध्ये या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, अशी माहिती गौड यांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्यावरून वाद झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. मात्र, पुलवामा हल्ल्याची माहिती शाकीरपर्यंत पोहोचल्यानंतर त्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यामुळे तो अन्य भारतीय कैद्यांच्या हिटलिस्टवर आला होता. हेच त्याला मारहाण करण्याचे कारण असल्याची चर्चा आहे. तथापि, याबाबत अधिकृत माहिती नाही.

Leave a Comment