सातशे साथीदारांसह पाकिस्तानशी युद्धास तयार डाकू मलखानसिंग

malkhansing
एके काळी चंबळ खोऱ्यात दहशत माजवून चंबळ किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आणि आता हातातील शस्त्र त्यागुन समाजसेवेत रमलेले डाकू मलखानसिंग त्यांच्या ७०० साथीदारांसह पाकिस्तानशी युद्धास तयार असल्याचे जाहीर केले आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर केल्या गेलेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला आहे. त्यास मलखानसिंग अपवाद नाहीत.

कानपूर येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमात मलखानसिंग बोलत होते. ते म्हणाले, शहीद जवानांच्या हत्येचा बदला घेण्यास आम्ही तयार आहोत. आजही मध्यप्रदेशात माझे ७०० साथीदार आहेत. सरकारने परवानगी द्यावी आम्ही पाकिस्तान सीमेवर जाऊन विना अट, विना वेतन युद्धास तयार आहोत. देशाच्या सीमेवर प्राणार्पण करण्याची आमची तयारी आहे.

पत्रकारांशी बोलताना मलखानसिंग म्हणाले, आम्ही सरकारला लिहून देतो कि आम्ही मारले गेलो तर त्यात सरकार दोषी नाही. उर्वरीत आयुष्य देशसेवेसाठी घालविण्याची इच्छा आहे. सीमेवरून मागे हटलो तर नाव सांगणार नाही. आमची हि इच्छा सरकारने पुरी करावी आणि आम्हाला सीमेवर पाठवावे.

Leave a Comment