मिसिंग मॅन फॉर्मेशन मधून विंग कमांडर गांधी यांना श्रद्धांजली

missing
बंगलोर येथे सुरु झालेल्या एरो इंडिया २०१९ च्या पहिल्या दिवशी बहुचर्चित राफेल विमानांनी उड्डाण केलेच पण त्याचबरोबर पहिल्याच दिवशी जग्वार, तेजस आणि सुखोई जेट्सनी आकाशात भरारी घेताना मिसिंग मॅन फॉर्मेशन मधून विंग कमांडर साहिल गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

बंगलोरच्या येलहांका येथे सुरु असलेल्या एरो इंडिया शो कार्यक्रमाअगोदर हवाई दलाची एरोबॅटीक टीम सूर्यकिरण सराव करत असताना १९ फेब्रुवारी रोजी दोन विमानांची आकाशात धडक होऊन झालेल्या अपघातात विंग कमांडर साहिल गांधी यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे पायलट जखमी झाले होते. त्यामुळे जग्वार, तेजस आणि सुखोई विमानांनी मिसिंग मॅन फॉर्मेशन मध्ये उड्डाण केले. या फॉर्मेशन मध्ये एरवी चार विमाने असतात पण मिसिंग मॅन मध्ये तीन विमाने उडाली आणि चौथ्या विमानाची जागा मोकळी ठेवली गेली.

या शो मध्ये प्रथमच राफेल विमानांनी उड्डाण केले. मात्र ही विमानेही गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी कमी वेगाने उडविली गेली.