केरळ पोलिसात दाखल झाला देशातील पाहिला रोबो पोलीस

kpbot
भारताची तंत्रज्ञानातील प्रगती वेगाने सुरु असल्याचे सिद्ध झाले असून देशातील पहिला रोबो कॉप केरला पोलीस विभागात दाखल झाला आहे. जगातला हा चौथा रोबो पोलीस आहे. केरळच्या राजधानीच्या पोलीस मुख्यालयात हा ह्यूमनाईड रोबो दाखल झाला असून त्याचे नामकरण केपी- बॉट असे केले गेले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयान यांनी त्याचे उद्घाटन केले.

या रोबोला सब इन्स्पेक्टरचा दर्जा दिला गेला आहे. मंगळवारी या रोबोचे उद्घाटन करताना विजयन यांनी त्याला सॅल्यूट केला तेव्हा रोबोने त्यांना उलट सॅल्यूट ठोकला. मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांचे स्वागत करणे, त्यांना गरजेनुसार विविध विभागांचा रस्ता सांगणे अशी कामे या रोबो करणार आहे. त्याचा वापर फर्स्टकॉन्टॅक्ट पॉइंट म्हणूनही केला जाणार असून हा रोबो डेटा गोळा करण्यास सहाय्य करेल असे समजते.

Leave a Comment