या तारखेला पहायला मिळणार नागराज मंजुळेंची ‘झुंड’

nagraj-manjule
मराठी सिनेसृष्टीला सैराट सारखा सुपरडुपर हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे सध्याच्या घडीला आपला पहिला बॉलीवूडपट झुंडमुळे चर्चेत आहेत. सैराट फेम रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर हे देखील अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात झळकणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली असून हा चित्रपट याचवर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या 20 तारखेला रिलीज होणार आहे.

स्लम फुटबॉल लिगची कथा झुंड चित्रपटात दाखवण्यात येणार असून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कर्तृत्ववान कोचची आहे. ही कथा विजय बारसे यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली आहे. अमिताभ बच्चन ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातील इतर कलाकार हे खरोखर झोपडपट्टीत राहणारे फुटबॉल खेळाडू आहेत.

Leave a Comment