तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर रिलीज

weddingcha-shinema
‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या समोर संगीतकार गायक म्हणून येणारे सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर येत आहेत. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी या चित्रपटातील बहुचर्चित बोल पक्या हे गाणे रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

एका लग्नाच्या शुटिंगची धमाल ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे आणि कसदार कलाकारांची तगडी स्टारकास्ट झळकणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनिल बर्वे, अश्विनी कळसेकर, प्रविण तरडे, संकर्षण कऱ्हाडे हे सर्व कलाकार भूमिका साकारत आहेत.

अभिनेता शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. सलील कुलकर्णी यांनीच चित्रपटाची कथा, संगीत, संवाद आणि दिग्दर्शन ही सर्व धुरा सांभाळली आहे.

Leave a Comment