भारतात लाँच झाली ट्रायम्फची स्ट्रीट ट्विन

triumph
नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत ट्रायम्फ मोटारसायकल्स इंडियाने आपली 2019 ट्रायम्फ स्ट्रीट ट्विन लाँच केली असून 7.45 लाख रुपये (एक्स शोरुम, इंडिया) या बाईकची किंमत आहेत. कंपनीने यामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल केले आहे. कॉस्मॅटिक बदल ट्रायम्फ स्ट्रीट ट्विनमध्ये करण्यात आले आहेतच त्याचबरोबर यात अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
triumph1
10 bhp जास्त पॉवर यामध्ये देण्यात आली आहे. 2019 ट्रायम्फ स्ट्रीट ट्विनमध्ये रायडर एर्गोनॉमिक्स आणखीन आरामदायक सीट-टू-फूट रायडिंग पोजिशन, अतिरिक्त आरामसाठी रायडर आणि पिलियन दोन्हीसाठी सीट फोम 10 mm जास्त वाढवण्यात आले आहे. बाईकची सीट हाईट 760 mm तर वजन 198 kg आहे.
triumph2
900 cc हाय-टॉर्क पॅरलल ट्विन लिक्विड कूल्ड इंजिन ट्रायम्फ स्ट्रीट ट्विन या बाईकमध्ये देण्यात आले आहे. बाईकची पावर 18 टक्के जास्त म्हणजे 54 bhp पासून 64 bhp (7500 rpm) करण्यात आली आहे. टॉर्क 3800 rpm वर 80 Nm आहे. इंजिनचा कम्प्रेशन रेशिओ 10.6:1 पासून 11:1 झाला आहे.
triumph3
दोन रायडिंग मोड्स- रेन आणि रोडसह नवी स्ट्रीट ट्विन येते. याशिवाय स्विचेबल ट्रेक्शन कंट्रोलसह एक टॉर्क असिस्ट क्लच पण यामध्ये देण्यात आले आहे. राइड-बाय-वायर सिंगल थ्रोटल बॉडीमुळे राईडेबिलिटी, सेफ्टी आणि कंट्रोलमध्ये वाढ झाली आहे. बाईकमध्ये कन्टेम्पररी लोगो, आणखीन चांगले फिनिशिंग आणि डिटेलिंग करण्यात आले आहे. बाईकमध्ये कास्ट अॅल्युमीनियम मल्टी-स्पोक अलॉय-फ्रंटमध्ये 18 इंची आणि रिअरमध्ये 17 इंचीचा देण्यात आला आहे.

Leave a Comment