आज देशभरातील पेट्रोल पंप संध्याकाळी 20 मिनिटे राहणार बंद

petrolpump
मुंबई : आज देशभरातील सर्व पेट्रोलपंप पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संध्याकाळी 20 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार असून सर्व पेट्रोल पंपावरील दिवे 20 मिनिटे मालवण्यात येणार असून सर्व व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती द कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सने दिली आहे. यात त्यांच्या महाराष्ट्रातील पेट्रोल डीलर्स संघटना (फामपेडा) सहभागी होणार आहेत.

देशभरात सीआयपीडीचे 56 हजार पेट्रोल पंप असून बॅनर आणि फोटो या सर्व पेट्रोल पंपावर लावून तिथले दिवे आज संध्याकाळी 7 ते 7.20 दरम्यान मालवले जातील. त्याचबराबर शहीदांना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात येईल, असे सीआयपीडीचे प्रभारी सरचिटणीस के सुरेश कुमार यांनी सांगितले आहे.

पेट्रोल डीलर्सने नागरिकांना भारतीय सैन्याप्रती असलेली कृतज्ञता आणि ऐक्य दर्शवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तर वाहनधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी या कालावधीपूर्वी किंवा नंतर पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे, असे संघटनेने म्हटले आहे.

Leave a Comment