पुलवामा हल्ल्यानंतर उरी सर्जिकल स्ट्राईकच्या कमाईत वाढ

urri
विकी कौशल च्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या कमाईत पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांव झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर चार दिवसात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पुलवामा हल्ल्याचा राग आणि दुःख व्यक्त करण्यासठी उरी ला गर्दी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या चार दिवसात या चित्रपटाची कमाई ८ कोटी २४ लाख्वर गेली असून बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या ३८ व्या दिवशी ही कमाई २२७ कोटी ३७ लाख नोंदविली गेली आहे.

१८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीर मधील उरी सेक्टर लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता त्यात १९ जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ला १९ फेब्रुवारीला झाला. उरी हल्ल्याचा बदला भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक करून घेतला होता त्यावर उरीचे कथानक बेतले गेले आहे. देशभरात सध्या ८४० स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात असून तो ऑल टाईम ब्लॉकब्लस्टर यादीत सामील झाला आहे. अवघ्या ४० कोटीच्या बजेट मध्ये हा चित्रपट बनविला गेला होता.

Leave a Comment