जाणून घेऊ या ‘गुड फ्रायडे’ बद्दलची काही रोचक तथ्ये

good-friday
यंदाच्या वर्षी ‘गुड फ्रायडे’ आणि ‘इस्टर’ हे ख्रिश्चन धर्मासाठी महत्वपूर्ण असणारे सण एप्रिल महिन्यामध्ये येत आहेत. ज्या दिवशी भगवान येशूला सुळावर चढविण्यात आले तो दिवस आता जगभर गुड फ्रायडे म्हणून साजरा होतो. या दिवसाशी निगडित अनेक रूढी, परंपरा निरनिरळ्या देशांमध्ये आजही आवर्जून पाळल्या जात असतात. या सणाशी निगडित अशा काही ठराविक मान्यता ही आहेत, त्यांच्याविषयी जाणून घेऊ या. पोप बेनेडिक्ट
(सोळावे) यांनी क्युबा देशाला भेट दिल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून क्युबा सरकारने देशभरामध्ये दर वर्षी गुड फ्रायडेची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घरी राहून या सणाच्या निमित्ताने पाळावयाचे विधी करता येणे नागरीकांना शक्य होऊ शकले. या दिवशी खास बनविले जाणारे ‘हॉट क्रॉस बन्स’ हे अतिशय शुभ मानले जात असून या दिवशी बनविले गेलेले हे बन्स कधीही खराब होत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे हे बन घरामध्ये बनविल्याने घरावर येणारे हर तऱ्हेचे अरिष्ट दूर होत असल्याचेही म्हटले जाते.
good-friday1
हा दिवस अतिशय पवित्र मानला जात असल्याने जर्मनीमध्ये या दिवशी नाईटक्लब्स आणि इतर तत्सम मनोरंजनाची ठिकाणे बंद ठेवली जातात. जर एखादे नाईटक्लब उघडले असलेच तर त्याच्या मालकाला जबर दंड ठोठाविला जातो. या दिवशी कोंबड्यांनी किंवा बदकांनी दिलेली अंडी कधी खराब होत नाहीत अशी ही एक मान्यता आयर्लंड देशामध्ये आहे. त्यामुळे या अंड्यांवर ख्रिस्ताच्या क्रॉसचे चिन्ह बनविले जाते. ही अंडी अतिशय शुभ मानली जात असून, यांमुळे घरामध्ये भरभराट आणि भाग्य येईल अशी भाविकांची श्रद्धा असते.
good-friday2
गुड फ्रायडेच्या दिवशी बर्म्युडामध्ये पतंग उडवून हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी येथील रहिवासी समुद्रकिनारी जातात, पंतग उडवितात, आणि पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेतात, तर न्यूझीलंड देशामध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी दूरचित्रवाणी वर जाहिराती प्रसारित केल्या जात नाहीत. या दिवसाचे धार्मिक महत्व लक्षात घेता या दिवशी जाहिराती प्रसारित न करण्याचा कायदा इथे आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिश्चन बांधव उपवास ठेवत असून, हा उपवास इस्टर संडे पर्यंत सुरु राहतो. या उपवासादरम्यान केवळ एकदाच जेवण्याचा नियम असतो. तसेच या दिवशी जगातील प्रत्येक चर्चमध्ये तेहतीस वेळा घंटानाद केला जातो. भगवान येशूचे भूतलावरील अस्तित्व तेहतीस वर्षांचे असल्याचे दर्शविणारा हा घंटानाद आहे. गुड फ्रायडेच्या आधी येणारा गुरुवार ‘होली थर्सडे’ म्हणून साजरा केला जातो. तर शुक्रवार नंतर येणारा शनिवारचा दिवस ‘होली सॅटर्डे’ म्हणून ओळखला जातो. त्यांनतर येणारा रविवार ‘इस्टर संडे’ असतो.

Leave a Comment