किरकोळ किमतीला मिळणारी वांगी आरोग्यासाठी लाभदायी

brinjal
बाजारात गेल्यावर वांगी खरेदी आवर्जून करणारे ग्राहक तसे कमी असतात. आपल्याकडे अन्य भाज्या जेवढ्या आवडीने घेतल्या जातात त्यामानाने वांगी घेतली जात नाहीत. वांगी हि फारशी महाग भाजी नाही. मात्र आरोग्यासाठी ती अतिशय फायदेशीर आहेत याची अनेकांना कल्पना नसते.

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांना वजन घटवायचे आहे त्यांनी आहारात वांग्यांचा समावेश जरूर करावा. १०० ग्रॅम वांगी खाल्ली तर त्यातून फक्त २५ कॅलरी मिळतात. बाजी, भरीत, काप, नुसती उकडून अश्या विविध प्रकाराने वांगी वापरता येतात. वांग्याचे अन्य फायदे म्हणजे यात फायबर मुबलक प्रमाणात असल्याने दीर्घ काळ पोट भरलेले राहते आणि खाणे कमी होऊन वजन घटते.

bringle1
वांग्यात पोटेशियम, मॅग्नेशियम विपुल प्रमाणात आहे. हे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. वांग्यामध्ये डायेटरी फायबर अधिक असून त्यामुळे आतड्याचा आत चिकटलेला मळ सहज सुटतो आणि पोट साफ होते. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.

वांग्यात आयर्न आणि कॅल्शियम आहे. तसेच यात फिनॅलिक अॅसिड आहे. यामुळे शरीरातील हाडांची घनता वाढून ती अधिक बळकट होतात. आर्यन मुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते व अशक्तपणा दूर होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment