‘पाकिस्तानी सानियाची तेलंगणाच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदावरुन हकालपट्टी करा’

raja-singh
नवी दिल्ली – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून त्यात आता तेलंगणातील भाजपचे एकमेव आमदार राजा सिंह यांनी टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्तानाची सून असल्याचे म्हटले आहे.

घटस्फोटीत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी दुसऱ्यांदा सानिया मिर्झाने लग्न केले असून ती आता आपल्या देशाची नागरिक नसून पाकची सून असल्यामुळे ती पाकची नागरिक असल्याचा दावा करत सानियाकडून तेलंगणाचे ब्रँड अॅम्बेसिडर पद काढून घेण्याची मागणी तेलंगणातील भाजप आमदार राजा सिंह यांनी केली आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला सायनाच्या जागी तेलंगणा राज्याचे ब्रँड अॅम्बेसिडर करावे, अशी मागणीही राजा सिंह यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment