सोनी टीव्हीने अद्याप माझ्याशी संपर्क केलेला नाही – अर्चना पुरण सिंह

archana-puran-singh
सोनी टीव्हीने नवज्योतसिंह सिद्धु यांची द कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पूरण सिंह ही आता या शोची भाग असणार आहे. त्याचबरोबर तिने या शोच्या दोन एपिसोडचे शूटींग देखील पूर्ण केल्याचे वृत्त होते. पण हे वृत्त अर्चनाने नाकारले असून आपण अद्याप सिद्धुंची जागा घेतली नसल्याचे म्हटले आहे.

सोनी टीव्हीने नवज्योत सिंग सिध्दू यांची पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हकालपट्टी करण्यात आली होती. सोनी टीव्हीने सिध्दू यांना हटवल्यानंतर अर्चना पुरण सिंहचे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये स्वागत केले आहे. पण अद्यापही सिध्दूची जागा अर्चना घेणार का हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

याबाबत अर्चना पुरण सिंहला विचारले असता ती म्हणाली अद्याप सोनी टीव्हीकडून मला कोणतीही सुचना मिळालेली नाही. ती म्हणाली, पुलवामा हल्ल्याच्या अगोदर मी ‘द कपिल शर्मा शो’चे दोन भागांचे शूट केले आहे. नवज्योत सिंह सिध्दू काही कारणाने व्यस्त असल्यामुळे मला दोन भागांसाठी संपर्क करण्यात आला होता.

Leave a Comment