प्रियंकापेक्षाही सुपर हॉट आहे तिची बहीण मीरा चोप्रा

meera-chopra
बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील आपल्या अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. पण आज तुम्हाला आम्ही प्रियंकाबद्दल नाहीतर तिची बहिण मीरा चोप्राबद्दल सांगणार आहोत. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असे की परिणिती चोप्रा ही तिची बहीण आहे ना? मग ही नवी बहीण आली कुठून.मीरा ही प्रियंका आणि परिणीतीची चुलत बहीण आहे. पण मीरा चोप्रा ही काहीच चित्रपटांमध्ये झळकली होती. त्यानंतर लाईमलाईटपासून दूर झाली.
meera-chopra1
मीरा चोप्राने विक्रम भट्ट यांच्या 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या गँग ऑफ घोस्ट या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती विक्रम भट्ट यांच्याच 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या 1920 लव्ह स्टोरी या चित्रपटात शेवटची झळकली. पण या दोन्ही चित्रपटांना म्हणावे तसे यश न मिळाल्यामुळे तिने आपला मोर्चा दक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला. मीरा आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करायला तयार झाली आहे.
meera-chopra2
मीराला अजय बहलच्या आगामी ‘सेक्शन ३७५’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. हा एक कोर्ट रूम ड्रामा असणार आहे. रिचा चड्ढा, अक्षय खन्ना आणि राहूल भट्ट यांची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मीरा चित्रपटात एका बलात्कार पीडितेची भूमिका साकारताना दिसणार आहे. मीरा निक आणि प्रियंकाच्या लग्नाच्या दिल्ली येथील रिसेप्शनलाही गेली होती. यावेळी मीरासोबत तिचे आई- बाबाही होते. मीराने याशिवाय नुकतेच एका वेबसीरिजचे चित्रीकरण पूर्ण केले. या सीरिजचा काही भाग कॅनडात चित्रीत करण्यात आला आहे. मीराला ‘सेक्शन ३७५’ शिवाय शैलेश वर्माच्या ‘नास्तिक’ चित्रपटातही भूमिका मिळाली आहे.

Leave a Comment