‘अमूल’च्या बाहुलीला देखील पडली गली बॉयची भूरळ !

amul
बॉक्स ऑफिसवर व्हॅलेंटाईन डेच्या रणवीर सिंह आणि आलिया भट्ट अभिनीत गली बॉय हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात रणवीरने साकारलेली रॅपरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूपच आवडली असल्याची पोहच पावती चित्रपटाच्या कलेक्शनच्या माध्यमातून दिली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रणवीरच्या कारकिर्दीला एक नवे वळण देऊन गेला. प्रत्येकजण ‘अपना टाईम आयेगा’ असे म्हणत या चित्रपटाला दाद देत असतानाच यात ‘अमूल’ देखील मागे राहिलेले नाही.

‘अमूल’ नेहमीच विविधरंगी आणि बहुचर्चित विषयांना हाताळत त्यावर तितक्याच कलात्मकचेते आणि अर्थातच चवीने भाष्य करणारे कार्टून साकारत सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित आणते. त्यांनी यावेळीसुद्धा असेच काहीसे केले आहे. ज्याला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळत आहे. ‘अमूल’कडून यावेळी #Amul Topical या हॅशटॅगअंतर्गत ‘गली बॉय’ या चित्रपटाचे यश साजरा करत एक सुरेख कार्टून सादर करण्यात आले आहे.


‘अमूल’ची बाहुली ही ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या कार्टूनमध्ये आलियाच्या रुपात दिसत असून, ही ‘सफिना’ नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. त्याचबरोबर यामध्ये शिवाय रणवीर आणि सिद्धांच चतुर्वेदी यांच्या चित्रपटातील भूमिकांच्या आधारावरही कार्टून साकारण्यात आले आहे. या नव्या पोस्टमध्ये ठळक अक्षरात ‘अपना टाईम है… खाएगा!’ असे लिहिण्यात आल्यामुळे ‘गली बॉय’ला मिळालेला हा चवदार टच काही औरच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Comment