
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेचा जगभरातून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जाता आहे. त्यात अभिनेता अजय देवगन याने देखील ट्विटरच्या माध्यमातून माझा राग मी शब्दात व्यक्त करू शकत नसल्याचे म्हणत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. एकदंर परिस्थिती पाहता टोटल धमालच्या पूर्ण टीमने आपला चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अजय देवगन पाकिस्तानात प्रदर्शित करणार नाही ‘टोटल धमाल’
पाकिस्तानात हिंदी चित्रपट बघणारा मोठा वर्ग असल्यामुळे तिथे देखील भारतीय चित्रपटांना चांगली पसंती मिळते. भारतीय चित्रपट पाकिस्तानात चांगला गल्ला जमावत असल्याचेही समोर अले आहे. पण हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय अजय देवगनने घेतला आहे. हा चित्रपट या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार असून चित्रपटात रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, अर्शद वारसी, जावेद जाफरी अशी तग्गडी स्टार कास्ट आहे. त्याचबरोबर टोटल धमालच्या टीमने पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी 50 लाखांचा मदत निधी देखील गोळा केला आहे.
