रिर्झव्ह बँकेचे अलर्ट: स्मार्टफोनमधून डिलीट करा एनीडेस्क अॅप

RBI1
मुंबई – देशातील जनतेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी करुन त्यांना सावध राहण्याची सुचना केली आहे. या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेने यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या पैशांच्या व्यवहारात फसवणूक होत असून ग्राहकांचे खाते रिकामे केले जात असल्याच्या तक्रारी बँकेकडे येत आहेत. त्याचबरोबर त्यापासून बचाव करण्याचे उपाय देखील आरबीआयने सुचवले आहेत. एनीडेस्क अॅप आपल्या स्मार्टफोनमधून तात्काळ डिलीट करावे असे बँकेने म्हटले आहे.

आरबीआयच्या अधिसूचनेनुसार एनीडेस्क मोबाईल अॅपचा वापर ग्राहकांनी करु नये. आपल्याकडून हे अॅप काही परवानग्या घेऊन आपल्या बँक खात्याला हॅक करते. ग्राहकाचे खाते हॅक झाल्यानंतर त्यांचे खाते रिकामी करण्याची शक्यता आहे. एखाद्या रिमोट कंट्रोल प्रमाणे हे अॅप काम करते. अनेक डिव्हाईस एकमेकांशी जोडण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

याबाबत रिझर्व्ह बँकेच्या सायबर सिक्यूरिटी आणि आयटी एक्झामिनेशन सेलने अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, हे अॅप आपल्या फोनमध्ये एकदा इंस्टॉल झाल्यास फोनमध्ये असलेल्या इतर अॅप्सचे अॅक्सेस मागितले जाते. ही परमिशन मिळाल्यानंतर एनी डेस्क आपल्या फोनमध्ये असलेल्या पेमेंट अॅपची माहिती, आयडी आणि पासवर्ड रेकॉर्ड करते. तसेच एनीडेस्क यूझरच्या डिव्हाइसवर 9 अंकांचे अॅप कोड जनरेट करते. सायबर हल्लेखोर कॉल करून हाच कोड बँकेच्या नावावर मागतात. अशा पद्धतीने कित्येक ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे.

Leave a Comment