महाजन कुटुंबात एवढे मोठे महाभारत का घडले पुनम ? – अजित पवार

ajit-pawar
बारामती – काही दिवसांपूर्वी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शकुनी मामा असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. आता राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे आयोजित विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात यावर भाष्य करताना अजित पवार यांनी बोलताना तुझ्या बापाला पूनम तुझ्या चुलत्याने का मारले? एवढे मोठे महाभारत महाजन कुटुंबात का घडले? आम्ही पातळी सोडत नाही याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु असे समजू नये, असे म्हटले आहे.

तुम्हाला शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्यातील संबंध काय, त्याचबरोबर आपण राजकारणात किती वर्ष आहात आणि आपला अनुभव किती आणि आपण बोलतो किती, याचे भान न ठेवता पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्यावर. पण त्यांना महाजन कुटुंबात एवढे मोठे महाभारत का घडले? याचे उत्तर देता येईल का?, असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आम्ही पातळी सोडत नाही, याचा अर्थ आम्ही काहीही सहन करु, असे समजू नये, असेही अजित पवार पूनम महाजन यांनी म्हटले आहे. अजित पवार बोलत होते.

Leave a Comment