बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर आधारित मालिकेचा प्रोमो रिलीज

bhimrao
स्टार प्रवाह वाहिनीने इतिहासाचे सोनेरी पान पुन्हा उलगडण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या वाहिनीवर ‘भीमराव’ ही मालिका सुरू होणार असून यात देशाच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र दाखवण्यात येणार आहे.

लवकरच स्टार प्रवाहवर ‘भीमराव – एक गौरवगाथा’, ही नवीन मालिका सुरू होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे, अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने आणि कुशल नेतृत्वाने शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी आपल्या लोकांना ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा संदेश दिला. आता मालिकेच्या माध्यमातून महामानवाचे हेच महानकार्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मालिका १४ एप्रिलला म्हणजेच डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला सुरू होत आहे.