व्हॉट्सअॅपवर भारतीय लष्कराच्या मदतीसाठी फिरणार मेसेज बोगस

whatsapp
नवी दिल्ली : मागील आठवड्याच्या गुरुवारी जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना जागृत झाली आहे. त्याच दरम्यान व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात प्रत्येक भारतीयाने आपल्या लष्करासाठी कमीतकमी एक रुपया द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर यासाठी राजधानी दिल्लीतील साऊथ एक्सटेंशनमधील सिंडिकेट बँकेत सैनिक कल्याण निधी नावाने खाते उघडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अभिनेता अक्षय कुमारच्या सूचनेनुसार हे खाते उघडण्यात आल्याचा उल्लेख देखील यात करण्यात आला आहे. पण याची माहिती जेव्हा लष्कराच्या जनसंपर्क खात्याला मिळाली त्यानंतर त्यांना ते खाते पुर्णतः बोगस असल्याचे म्हटले आहे.

संबंधित खात्याशी भारतीय सरकारच्या किंवा लष्कराचा काडीमात्र संबंध नसल्यामुळे याद्वारे कोणी लोकभावनेशी खेळण्याचा तथा लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर जे बँक खाते देण्यात आले आहे ते सैनिक कल्याण निधीचे देण्यात आले. त्याचा केंद्रीय राखीव पोलीस दलाशी संबंध नसल्यामुळे असे मॅसेज आल्यावर त्यांची चौकशी करणे कधीही हिताचे ठरणार आहे.

Leave a Comment